मुख्यमंत्री भूखंड वाटप विषयावर पुन्हा गोंधळ

 मुख्यमंत्री भूखंड वाटप विषयावर पुन्हा गोंधळ

नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी नागपुरातील एक भूखंड नियमित केल्याप्रकरणी कालपासून सुरू झालेला गोंधळ आज विधान परिषदेत पुन्हा उपस्थित केला गेला त्याला सत्ताधाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतला,त्यामुळे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.Confusion again on CM plot allocation issue

नियम 289 नुसार विरोधकांनी आज पुन्हा त्यावर चर्चा करण्याची परवानगी मागितली , उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ती दिली , यामुळे सत्ताधारी जोरदार आक्रमक झाले , काल यावर उत्तर दिल्यानंतर पुन्हा चर्चेला परवानगी का देता असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला .

विरोधक ही यासाठी आक्रामक झाले त्यांनी चर्चेची मागणी केली यामुळे सभागृहात गदारोळ झाला. नियमबाह्य कामकाज होऊ देऊ नका, हे चालणार नाही , दबावात येउन कामकाज करू नका असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

तरीही उपसभापतींनी 289 ला परवानगी दिल्यानंतर सत्ताधारी आक्रमक झाले , नियम ३५ ची नोटीस एक दिवस आधी दिली आहे का ? असा आग्रही प्रश्न उपमुख्यमंत्री यांनी उपसभापती ना विचारला .
अशी नोटीस दिली नसल्याचे उपसभापतींनी स्पष्ट केले.

या दरम्यान सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक सामोरा-समोर आले त्यामुळे सभागृह दोन वेळा तहकूब करावे लागले.

अखेर उपसभापतींच्या दालनात सत्ताधारी, विरोधी नेत्यांची बैठक होऊन विधानपरिषद चे कामकाज पुन्हा सुरू झाले.

ML/KA/PGB
21 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *