पेंच व्याघ्र प्रकल्पात उन्हाळी पक्षी सर्वेक्षणाचे आयोजन

 पेंच व्याघ्र प्रकल्पात उन्हाळी पक्षी सर्वेक्षणाचे आयोजन

नागपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पेंच व्याघ्र प्रकल्पात 9 ते 11 जून 2023 या कालावधीत तीनसा इकोलॉजीकल फाउंडेशनच्या सहकार्याने नागरिक विज्ञानावर आधारित प्रथम उन्हाळी पक्षी सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात 11 राज्यांतील 70 स्वयंसेवक सहभागी झाले होते. सिटीझन सायन्स मॉडेलचा वापर करून विविध मौसमात पक्ष्यांची विविधता व घनता अभ्यास करने हा यामागचा उद्देश आहे.Conducting summer bird survey in Pench Tiger Reserve

सिटीझन सायन्स पद्धतीने सर्वेक्षण मोठ्या प्रमाणावर पाश्चात्य देशांमध्ये केले जाते आणि अलीकडे भारतातील अनेक क्षेत्रांत विविध जैवविविधता सर्वेक्षणांवरील मोठ्या प्रमाणात डेटा संकलनामध्ये याचा सहयोग आणि योगदान आहे.
सहभागींना 2-3 च्या टीममध्ये विभागले गेले व त्यांना 45 कॅम्प वर पाठवण्यात आले. तीनसा च्या टीमने डिझाइन केल्या नुसार सर्वेक्षणा दरम्यान पक्ष्यांची विविधता रेकॉर्ड करण्यासाठी लाईन ट्रान्सेक्ट आणि पॉइंट काउंट पद्धतीचा अवलंब केला गेला.

संपूर्ण माहिती”कोबो कलेक्ट” एप्लिकेशन द्वारे संकलित केल्यागेली, कार्यक्रमा दरम्यान पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक श्रीलक्ष्मी, उपसंचालक प्रभुनाथ शुक्ला, अजिंक्य भटकर, मानद वन्यजीव रक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि तीनसा चे सदस्य उपस्थित होते.
9 जून, रोजी सिल्लारी येथे उद्घाटन कार्यक्रमादरम्यान, श्री. विवेक राजूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सर्व सहभागींचे पेंच व्याघ्र प्रकल्प येथे स्वागत केले. श्री. प्रभुनाथ शुक्ल यांनी सर्व सहभागींचे स्वागत केले आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाविषयी माहिती दिली, श्री अजिंक्य भटकर यांनी अशा सर्वेक्षणांची आवश्यकता आणि नागरिक विज्ञान आधारित सर्वेक्षणांचा दीर्घकालीन संवर्धनासाठी कसा उपयोग करता येईल हे सांगितले.
TINSA मधील प्रेरणा शर्मा यांनी सहभागींची सर्वेक्षण पद्धत आणि तांत्रिक बाबींची माहिती दिली.
11 जानेवारी रोजी सिल्लारी येथे समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कोबो अॅपमध्ये एकूण 4500+ वैयक्तिक नोंदी एकत्रित केल्या आहेत आणि पेंच व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्रतिल सात वनपरिक्षेत्रामधून पक्ष्यांच्या एकूण 220 प्रजातींची नोंद केली आहे. मलबार पाईड हॉर्नबिल्स, ग्रे हेडेड फिश ईगल, एमराल्ड डव्ह, लाँग बिल्ड व्हल्चर, ब्लॅक ईगल, ग्रेट थिकनी, ऑरेंज हेडेड थ्रश, व्हाईट रम्पड गिधाड, स्पॉट बेलीड ईगल आऊल इत्यादी महत्त्वाच्या प्रजातींची नोंद केल्या गेली.
सर्वेक्षणादरम्यान संकलित केलेल्या डेटाचा तपशीलवार वैज्ञानिक अहवाल तीनसा टीम आणि पेंच व्याघ्र प्रकल्प लवकरच प्रकाशित करतील. या प्रकारची सर्वेक्षणं संवर्धन जागरूकतेसाठी अत्यंत महत्वाची ठरतात.या उपक्रमांद्वारे पर्यटनाला चालना मिळून व्याघ्र केंद्रीत संवर्धन आणि लॅंडस्केपस्तरावरील संवर्धनाकडे मोठ्या प्रमाणात नागरिकांना आकर्षित करता येईल.

ML/KA/PGB
13 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *