कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव मोठया उत्साहात संपन्न

 कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव मोठया उत्साहात संपन्न

अहमदनगर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल या दृष्टीने आम्ही विचार केला आहे. भावी पिढीला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जाताना त्यांच्या जीवनातील समस्या त्यांनी कशा सोडवाव्यात यासाठी हा हॅकेथॉन उत्सव विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरत आहे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केले.

अहमदनगर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग , जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था संगमनेर, अमेझॉन फ्युचर इंजिनिअर, लीडरशीप फॉर इक्विटी आणि कोड टु एनहान्स लर्निंग संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने दोन दिवसीय जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव जिल्हा पातळीवर रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग सभागृह अहमदनगर येथे संपन्न झाले त्यावेळी पाटील बोलत होते.
कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सवाला जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष संजय गुगळे,  विस्तार अधिकारी जयश्री कार्ले, वरिष्ठ अधीव्याखाते रामेश्वर लोटके आदींची प्रमुख उपस्थित होती.

भास्कर पाटील यावेळी म्हणाले, वाहतुकीच्या, पर्यावरणाच्या, शाळाबाह्य आणि इतर समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाद्वारे पुढाकार घेतला आहे. तसेच या समस्या वरील उपाय योजना विद्यार्थ्यांनी कोडींगद्वारे सुचविलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी यामध्ये व्हरच्युअल रियालिटीचा देखील अभ्यास केला आहे. थ्रीडी प्रिंटरच्या उपकरणाचा देखील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अनुभव घेतला आहे. भावी जीवनात नागरिक घडत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा या दृष्टीने विद्यार्थी येथूनपुढे प्रयत्न करणार आहेत. अहमदनगर जिल्हा परिषदेचे विद्यार्थी कोणत्याही स्पर्धेत मागे राहू नयेत यासाठी आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा उपक्रम राबविणार आहोत.

या हॅकेथॉन उत्सवात अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, तसेच जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी आणि शहरी ६०००  विद्यार्थ्यानी पहिल्या टप्प्यात नोंदणी करून सहभाग घेतला होता. त्यापैकी २३०० विद्यार्थ्यानी अनप्लग (कम्प्युटर शिवाय) चॅलेंज सोडवले. तर २३०० विद्यार्थ्यापैकी या अनप्लग चॅलेंज मधील अचूक मांडणी आणि उत्तमपणे कामगिरी केलेल्या मुलांची या निकषाआधारे जिल्हास्तरावर १२ शाळांमधील ३६ विद्यार्थ्याची कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सवासाठी निवड करण्यात आली.

निवड झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यानी स्क्रॅच प्लॅटफॉर्मवर कोडींग करत त्या समस्यावर उपाय शोधून कोडींगच्या सह्यायाने गेम,अॅनिमेशन आणि अॅप्लिकेशन स्वरूपात प्रोजेक्ट तयार केले. कोडींग प्रोजेक्ट तयार करताना विद्यार्थ्यांनी एकविसाव्या शतकातील चिकित्सक विचार , सहकार्य, संवाद कौशल्ये, समस्या निवारण यांचा वापर केला. ही कौशल्य नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळांमध्ये शिकवली गेली पाहिजे, हा प्रोग्राम या धोरणाशी संलग्न ठरत आहेत. या उत्सवात त्यांना आजूबाजूच्या समस्येवर आधारित कोडींग करून प्रोजेक्ट बनवून मान्यवरांसमोर सादर केली. हे प्रोजेक्ट रोड सेफ्टी, बाल कामगार या प्रकारच्या समस्या घेऊन तयार करण्यात आली होती.

या उत्सवामध्ये प्रथम पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेडे, ता. संगमनेर, द्वितीय पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक श्रीगोंदा उर्दू शाळा आणि तृतीय पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देर्डे कोऱ्हाळे यांनी पटकावला. एकूण सर्व १२ शाळांना ही पारीतोषिके देण्यात आली. यात पहिल्या पाच शाळांना ४३ इंची एलईडी टीव्ही देण्यात आला तर इतर ७ शाळांना टॅब आणि रोख बक्षिसे देण्यात आले. आणि पहिला क्रमांक आलेल्या शाळेला राज्यस्तरीय हॅकेथॉन उत्सवासाठी निवड करण्यात आली. स्पर्धकांच्या प्रोजेक्टच्या मूल्यांकनासाठी परीक्षक म्हणून जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, संगमनेरचे अधीव्याखाते रामेश्वर लोटके संचालक दामिनी मेनकर , लीडरशिप फॉर इक्विटी आणि सहसंचालक साईप्रसाद साळे यांनी भूमिका पार पाडली.

ML/KA/PGB 7 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *