४९ वे शतक पूर्ण करत, विराटने केले ५ विक्रम

 ४९ वे शतक पूर्ण करत, विराटने केले ५ विक्रम

कोलकाता, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज क्रिकेटपटू विराट कोहलीचा वाढदिवस.आज त्याने विक्रमी खेळी करत स्वत:सह चाहत्यांना विशेष भेट दिली आहे. विराट कोहली याने इडन गार्डनवर झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 37 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध शतक करत इतिहास रचला आहे. विराट कोहली याने 10 फोरसह हे शतक केलं. विराटच्या वनडे कारकीर्दीतील हे 49 वं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील म्हणजेच एकूण 87 वं शतक ठरलं. विराटने हे शतक करताच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या विक्रमाची बरोबरी केली.

या सामन्यात विराटने एकूण पाच मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

  • विराटने सचिनपेक्षा 174 कमी डावांमध्ये सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सचिनचे 49वे शतक त्याच्या 451व्या डावात झळकले. विराटचे 49वे शतक 277व्या डावात झळकले. या खेळीदरम्यान विराटने आणखी चार मोठे विक्रम आपल्या नावावर केले.
  • आज शतक ठोकून विराट मर्यादित षटकांमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू बनला आहे. कोहलीच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये 49 शतके आणि टी-20 मध्ये एक शतक, म्हणजे एकूण 50 शतके आहेत. पूर्वी ते 49 होते.
  • सचिनच्या नावावर 463 एकदिवसीय आणि एक टी-20 सामन्यात 49 शतके आहेत, तर विराटने 288 वनडे आणि 115 टी-20 सामन्यांमध्ये 50 शतके केली आहेत.
  • विराट कोहली हा चेस मास्टर असला तरी वनडेमध्ये धावांचा पाठलाग करताना त्याने सर्वाधिक 27 शतके ठोकली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेला सचिन शतकांच्या बाबतीत कोहलीच्या जवळपासही नाही, ज्याच्या नावावर 17 शतके आहेत, मात्र आज विराटने पहिल्या डावात शतक झळकावून एक विक्रम केला आहे. प्रथम फलंदाजी करताना त्याने दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाला मागे टाकत 22 शतके झळकावली आहेत. आमलाच्या नावावर पहिल्या डावात 21 शतके आहेत.
  • कोहलीने वर्ल्ड कपमध्ये 1500 धावा पूर्ण केल्या आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत सचिन तेंडुलकर (2278) सह अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (1743) आहे.
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावून विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये वाढदिवशी शतक झळकावणारा सातवा खेळाडू ठरला. यापूर्वी हा पराक्रम विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, रॉस टेलर, टॉम लॅथम आणि मिचेल मार्श यांनी केला आहे.

SL/KA/SL

5 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *