अधिवेशन संपण्यापूर्वीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

 अधिवेशन संपण्यापूर्वीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

धुळे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे आज धुळे दौऱ्यावर आले असून त्यांनी जिल्ह्यातील अवकाळी ग्रस्त धुळे व साखरी तालुक्यात तालुक्यातील आनंदखेडा, सिंधवंद व काळटेक या ठिकाणी अवकाळी व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या मका , कांदा गहू पिकाच्या शेतात पाहणी केली .

शेतकऱ्यांची संवाद साधताना यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सणाच्या दिवशी देखील मला शेतकऱ्यांसोबत बोलून हे सरकार त्यांच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी पाठवलं आहे, असे म्हणत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सणाच्या दिवशी देखील मी नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना दिलासा घेण्यासाठी आलो असून सरकार आपल्या सोबत असल्याचे स्पष्ट केले .

हे अधिवेशन संपण्याच्या आत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा करतील असे म्हणत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एक लाख 39 हजार हेक्टरवर अवकाळी व गारपीटीचे नुकसान झाले असल्याचे म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप होता आता तो मिटल्यानंतर सर्व कामांना सुरुवात झाली असून, दोन दिवसाच्या आत सर्व शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे सरकारकडे सादर होतील असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

नुकसान भरपाई वर बोलत असताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सहा महिन्यात चौथांदा या सरकारला नुकसान भरपाई देण्याची वेळ आली असल्याचे देखील स्पष्ट केले आहे,मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य नागरिकांचा सण हा चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी आनंदाचा शिधा देण्याचा जो निर्णय घेतला आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी जरी आनंदाचा शिधा हा नागरिकांना मिळाला नसेल, तरी देखील तो यापुढेही रमजान असेल तसेच आंबेडकर जयंती असेल या सर्व सणांना हा आनंदाचा सीधा देणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.Compensation to the affected farmers before the end of the session

ML/KA/PGB
22 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *