राज्यातील अवकाळीची नुकसान भरपाई १५ जुलैपर्यंत
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात यावर्षी जानेवारी ते मे महिन्या दरम्यान झालेल्या अवेळी पावसामुळे २,९१,४३३ हेक्टर जमिनींवरील पिकांचं नुकसान झालं असून राज्य सरकारने यासाठी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला असून त्याचं वितरण येत्या १५ जुलै पर्यंत करण्यात येईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री अनिल पाटील यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.
१७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आधी ४९५ कोटींच्या नुकसानीचे प्रस्ताव शासनाकडे आले होते, मात्र त्यात आणखी ९ जिल्ह्यांचे नुकसान झाल्याचे आढळून आले त्यामुळे ते एकत्रित करून परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाकडे NDVI निकषानुसार आहेत का हे तपासून पाहण्यासाठी पाठवले आहेत.
त्यानंतर ते पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून त्यांच्याकडून ज्या रकमेचे अहवाल येतील त्याला मान्यता देऊन त्याचं वितरण केलं जाईल अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली. याआधी आजवर केवळ २४ कोटींची भरपाई दिली गेली असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. बाळासाहेब थोरात , नितीन राऊत आदींनी उपप्रश्र्न विचारले.
ML/ML/SL