ओबीसींच्या विकासासाठी बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत

मुंबई, दि. ३ : मनोज जरांगेच्या आंदोलनानंतर शासनाने मराठ्यांना देण्याबाबतचा जीआर काल प्रसिद्ध केला त्यानंतर ओबीसी समाज घटकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ओबीसी समाज मराठ्यांचा ओबीसीकरणाला सुरुवातीपासून विरोध करत आहेत, जो सध्या आणखी तीव्र झाला आहे. यामुळे सरकारने ओबीसींसाठीही महत्वाचे पाऊल उचलले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करणार आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत आणि छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह आणखी आठ मंत्री समितीचे सदस्य असणार आहेत. ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाबाबत कार्यक्रम आखण्यात येणार आहेत. यांसंबंधित योजनांबाबत ही समिती कामकाज पाहणार असल्याचे वृत्त आहे.