आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले सकाळ सन्मान 2023 या पुरस्काराने सन्मानित

 आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले सकाळ सन्मान 2023 या पुरस्काराने सन्मानित

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांना सकाळ सन्मान 2023 या पुरस्काराने गौरविण्यात आले. “समृद्ध महाराष्ट्र” या संकल्पनेवर आधारित सकाळ सन्मान हा सोहळा रविंद्र नाट्यमंदिर, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. जनमाणसांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करणाऱ्यांचा ‘सकाळ सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव केला जातो. मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व विकासकामे पूर्ण जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न आयुक्त ढोले यांनी केला.

आयुक्त ढोले यांच्या काळात महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह, स्केटिंग रिंग, तरण तलाव, शहरातील नागरिकांसाठी भव्य असे मेडिटेशन सेंटर व धम्म सम्राट अशोक बुद्धविहार या वास्तूंचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्याचबरोबर रुग्णालय इमारत बांधकाम, प्रशासकीय भवन इमारत, तानाजी मालुसरे मराठा भवन, महाराष्ट्रतील सर्वप्रथम संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन इमारत, हरिवंश राय बच्चन हिंदी भाषा भवन इमारत या वास्तूंचे भूमिपूजन करण्यात आले असून ही विकासकामे जलद गतीने पूर्ण करण्यात येणार आहेत.

हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे व स्व. प्रमोद महाजन कलादालन यासारख्या वास्तूंचे काम प्रगतीपथावर आहे. शहरातील बहुतांश अंतर्गत रस्ते हे सिमेंट काँक्रिटने तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. उद्यानांचे शहर ही वेगळीच ओळख निर्माण करून देण्याकरिता महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व उद्याने ही नागरिकांसाठी खुली करून त्याची योग्य ती निगा राखण्याचे कार्य सुरू आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेने विविध अभियानात राज्यस्तरावर तसेच देशपातळीवर विविध प्रकारचे मानांकन प्राप्त केले आहेत. यामध्ये राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान अंतर्गत तृतीय पारितोषिक, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राज्यस्तरावर भूमी या थिमॅटिक भागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार, इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका महाराष्‍ट्रात 3 लाख ते 10 लाख लोकसंख्या गटात प्रथम क्रमांकाचे मानांकन, सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज या राष्ट्रीय अभियानामध्ये मिरा भाईंदर महानगरपालिकेला देशस्तरावर 3 रे तर राज्यस्तरावर प्रथम मानांकन, स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियान अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिकेला 3 लाख ते 10 लाख लोकसंख्या गटात राष्ट्रपातळीवर तृतीय तसेच राज्यपातळीवर प्रथम क्रमांकाने मानांकन प्राप्त झाले आहे.

ML/KA/SL

28 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *