व्यावसायिक गॅस सिलिंडर झाले स्वस्त

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज महाराष्ट्र दिनानिमित्त हॉटेल व्यावसायिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलिंडरच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. आजपासून व्यावसायिक गॅस सरासरी तब्बल 171.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
प्रमुख शहरांतील व्यावसायित सिलिंडरचे दर
आजपासून मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 1980 रुपयांऐवजी 1808.50 रुपयांना उपलब्ध आहे. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर 2028 रुपयांऐवजी 1856.50 रुपयांना उपलब्ध आहे. कोलकात्यात सिलिंडरची किंमत 2132 रुपयांवरून 1960.50 रुपयांवर आली आहे. चेन्नईमध्ये 2021.50 रुपयांना सिलिंडर उपलब्ध आहे.
गेल्या महिन्यात म्हणजेच 1 एप्रिल रोजी तेल निर्मिती कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 92 रुपयांनी कपात केली होती. मात्र, यापूर्वी 1 मार्च रोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याचवेळी, घरगुती गॅस सिलेंडरची (14.2 किलो) किंमत 1103 रुपये आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल मार्च महिन्यात झाला होता. त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती एलपीजीच्या किमतीत 1 रुपयांनी वाढ केली होती.
SL/KA/SL
1 May 2023