व्यावसायिक सिलिंडर महागला

नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सणासुदीच्या निमित्ताने सरकारने घरगुती गॅसचे दर कमी केले आहेत. मात्र व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत मात्र आजपासून वाढ केली आहे. दिवाळीपूर्वीच सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांहून अधिक वाढ केली आहे. यामुळे सुणासुदीसाठीचे तयार खाद्यपदार्थ आणि मिठाया यांच्या किमती, तसेच हॉटेल्समधील जेवणाच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळेच या ना त्या कारणाने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे हे निश्चित.
दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1833 रुपयांवर पोहोचली आहे. कोलकातामध्ये 1943 रुपयांना उपलब्ध होईल. हे मुंबईत 1785.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1999.50 रुपयांना उपलब्ध असेल. याआधी 1 ऑक्टोबरलाही त्याच्या किमती सुमारे 200 रुपयांनी वाढल्या होत्या.
याआधी दिल्लीमध्ये 1731.50 रुपये, कोलकातामध्ये 1839.50 रुपये, मुंबईमध्ये 1684 रुपये आणि चेन्नईमध्ये 1898 रुपयांना उपलब्ध होते. 14.2 KG घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत 903 रुपये आणि भोपाळमध्ये 908 रुपयांना उपलब्ध आहे.
SL/KA/SL
1 Nov. 2023