अदानी समूहाकडून गुजरातमध्ये ७७५ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पाची सुरुवात

 अदानी समूहाकडून गुजरातमध्ये ७७५ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पाची सुरुवात

अहमदाबाद, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भविष्यातील जैव-इंधना साठ्याच्या मर्यादा लक्षात घेऊन देशातील बडे उद्योग समूह आता शाश्वत उर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीस प्राधान्य देत आहेत. देशातील अग्रगण्य उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जीने गुजरातमधील खवडा येथे ७७५ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षरित्या सुरू झाला असल्याची घोषणा अदानी समूहाने काल केली.

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की,या प्रकल्पासंदर्भात सर्व मंजुऱ्या मिळाल्यानंतरच या प्रकल्पाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. अदानी ग्रीन एनर्जीच्या पूर्ण मालकीच्या असलेल्या उपकंपन्यांद्वारे गुजरातमधील खवडा येथे एकूण ७७५ मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे.संबंधित मंजुरींच्या आधारे २९ मार्च रोजी प्लांट कार्यान्वित करण्याचा आणि वीज निर्मिती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला,असे कंपनीने कंपनीने शेअर बाजाराला सांगितले.

अदानी समूहाचा एक भाग असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीकडे भारतातील सर्वांत मोठा ऑपरेटिंग रिन्यूएबल पोर्टफोलिओ आहे, जो १२ राज्यांमध्ये पसरलेला आहे.

SL/ML/SL

30 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *