‘कमांडर – युद्धपट दिवाळी विशेषांका’चं प्रकाशन

 ‘कमांडर – युद्धपट दिवाळी विशेषांका’चं प्रकाशन

मुंबई दि. १९ :- ‘राष्ट्रभक्ती, युद्धपट’ असा आगळावेगळा विषय घेऊन कमांडरने आपला 29 वा दिवाळी अंक प्रकाशित केला. “मर्यादित साधनसामग्रीतही विषयांचं वैविध्य जपणे हा ‘कमांडर’ चा प्रयत्न स्तुत्य आहे!”, असं प्रतिपादन कालनिर्णयचे सहसंस्थापक व संपादक जयराज साळगांवकर यांनी केलं.

‘कमांडर’ दिवाळी – युद्धपट तथा देशभक्तीपर चित्रपट विशेषांकाचं मुंबईत संपन्न झालं, त्यावेळी ते बोलत होते. ‘कमांडर’चा या वर्षीचा 29 वा दिवाळी अंक हा ‘युद्धपट विशेषांक’ (देशभक्तीपर चित्रपट) आहे. 29 वर्षापासून सातत्य ठेवून ‘कमांडर’ने विविध विषयांवर विशेषांक प्रकाशित केल्याचं ऐकून त्यांनी आवर्जून कौतुक केलं.

गतवर्षीच्या रंगकर्मी या विशेष अंकाचाही त्यांनी विशेष कौतुक केले आणि ‘कमांडर’ला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “आपल्या देशाच्या सरहद्दीवरील वर्तमान परिस्थिती, आणि नुकत्याच झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर, जनसामान्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत पुन्हा जागी करण्यासाठी युद्धपट आणि देशभक्तीपर चित्रपटांवर दिवाळी विशेषांक काढण्याचं आम्ही ठरवलं”, असं या विषयाचं औचित्य यावेळी बोलताना ‘कमांडर’चे संपादक डॉ.राजू पाटोदकर यांनी स्पष्ट केलं.

यावेळी डॉ.पाटोदकर यांनी ‘कमांडर’च्या आतापर्यंत झालेल्या प्रवासाबद्दल थोडक्यात माहितीदेखील दिली. ‘कमांडर’ दिवाळी अंक राज्यात नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गोवा, बेळगाव, पुणे, मराठवाडा, कोकण, इंदोर, पनवेल, मुंबई, नवी मुंबई भागात लोकप्रिय असल्याचं सांगितलं.

कमांडर वैशिष्ट्यं

‘कमांडर’चा या वर्षीचा २९ वा दिवाळी अंक हा ‘युद्धपट विशेषांक’ (देशभक्तीपर चित्रपट) आहे. वाचकांची आवडी – निवडीची नेमकी नस ओळखून विशिष्ट विषय घेऊन त्यावर अत्यंत वाचनीय आणि संग्राह्य विशेषांक प्रकाशित करण्याचं २८ वर्षांचं वैशिष्ट्य ‘कमांडर’ने यंदाही कायम ठेवलं आहे. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ‘कमांडर’च्या सहसंपादक पत्रकार नयना रहाळकर, पत्रकार – लेखक अविनाश कोल्हे आदी उपस्थित होते.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *