आ. दरेकरांच्या हस्ते यंत्रसामुग्रीचे वाटप
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय जनता पार्टी मागाठाणे विधानसभा वॉर्ड क्रमांक २५ तर्फे विभागातील महिलांना आज ‘शिलाई मशीन आणि घरघंटी’ चे वाटप विधानपरिषदेचे गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी दरेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगात लोकप्रिय नेते आहेत. त्यांची ताकद अबाधित राहिली पाहिजे. आज आपला देश ५ व्या अर्थव्यवस्थेत आहे. पुढे महासत्ता बनू शकतो त्या दृष्टीने काम करा, असा कानमंत्र कार्यकर्त्यांना दिला.
याप्रसंगी भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या उपाध्यक्षा निशा परुळेकर, दिलीप उपाध्याय, कृष्णा दरेकर, रश्मी भोसले, रमेश विश्वकर्मा, प्रसाद प्रभू, वॉर्ड अध्यक्ष दिलीप सावंत, महिला मोर्चाच्या वॉर्ड अध्यक्षा अपर्णा क्षीरसागर, युवा मोर्चाचे अध्यक्ष जतीन कावा यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले की, आज ३५ महिलांना यंत्रसामुग्री मिळणार आहे. हे केवळ कार्यक्रमापुरते मशीन नको. त्या मशीनवर काम करा. चार पैशाचे अर्थसहाय्य होईल यासाठी काम करा. तुम्हाला काही मदत लागली तर त्या सर्व उपलब्ध करून दिल्या जातील. या मशिन्स घेणाऱ्या महिलांनी छोटा व्यवसाय केला पाहिजे. त्यामुळे कुटुंबाला हातभार लागेल. आपल्याकडून एकच अपेक्षा आहे की आपला आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदींना व भाजपाला मिळावा. आपण सर्व महिलांनी १०-१० घरांत जाऊन पंतप्रधान मोदींना समर्थन देणाऱ्या ९०९०९०२०२४ या क्रमांकावर मिसकॉल द्यायला लावा, अशी विंनतीही दरेकर यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, आज अनेक कामे वॉर्ड क्रमांक २५ मध्ये होत आहेत. त्याचा उल्लेख निशा परुळेकर यांनी केला आहे. आज आपले सरकार आहे. शिलाई मशिन्स न देण्यासाठी किती दबाव महापालिकेतून होता. मग मी लक्ष घातले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. त्यांनी लगेचच लक्ष घालून मागाठाणेतील वॉर्ड क्रमांक २५ मधील यंत्रसामुग्री मिळवून दिली. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे काळजी करायचे कारण नाही. कोण जातो कोण येतो याने आपल्यावर काही फरक पडत नाही. मी जेवढे प्रेम देतो, ताकदीने मागे उभा राहतो हे जाणाऱ्यांना कळेल. खरं म्हणजे अख्खी शिवसेना, अख्खा राष्ट्रवादी पक्ष आपल्याकडे आलाय आणि मग आपल्यातून कोणी सोडून जात असेल तर यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. तसेच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर्श घेऊन काम करायचे आहे. लोकांसाठी, गरिबांच्या कल्याणासाठी काम करायचे आहे. येणार येतील जाणारे जातील आपल्याला आपले मिशन चालू ठेवायचे आहे. जगात देशाचे एवढे नाव करून पंतप्रधान मोदींवर टीका होते. पण त्याकडे लक्ष न देता मला माझा देश मोठा करायचा आहे. लोकांची सेवा करायची आहे. या व्यापक उद्देशाने जेव्हा आपला नेता काम करतो तेव्हा आपणही चिंता करायची नाही. लोकांशी प्रतारणा करायची नाही, असेही दरेकरांनी सांगितले.come Distribution of machineries by Darekars
ते म्हणाले की, सुदैवाने आज आपले सरकार आहे. त्या सरकारच्या माध्यमातून सर्व कामं करू. काही लोकं कामं न करता बोर्ड लावतात. मी त्यांच्यासारखा थापा मारत नाही. असे सांगताना दरेकर यांनी नॅशनल पार्कमधील वनजमिनीचा पूर्ण प्रस्ताव राज्य सरकार नीट बनवत आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तसा आदेश दिलाय. त्याचा पाठपुरावा मी घेतोय. तो प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्राला पाठवला जाईल. गरज पडली तर मी दिल्लीलाही जाईन व वनजमिनींचा प्रश्न कायमचा निकाली काढू असे म्हटले. तसेच वीज, पाणी किंवा घर मिळण्याचे इतर विषय असतील ते निश्चित मार्गी लावू, असा विश्वासही दरेकर यांनी यावेळी दिला.
दरेकर पुढे म्हणाले की, राज्यात मोदी@९ महाजनसंपर्क अभियान सुरू आहे. गोरगरिबांची सेवा करा हा मंत्र पंतप्रधान मोदींनी दिला आहे. पंतप्रधान मोदी दिल्लीत राहून गरीबाच्या कल्याणाची चिंता करत आहेत. आपण त्यांचे कार्यकर्ते म्हणून आपलीही ही जबाबदारी आहे. पंतप्रधान मोदींनी ९ वर्षाच्या कारकिर्दीत केलेली कामे, सर्व घटकांना दिलेला न्याय, गरीबाच्या कल्याणासाठी होणारे काम, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात ६-६ हजार रुपये दिले जात आहेत, त्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान हवेत अशी धारणा जनतेची आहे. लोकांना चांगले आणि वाईट कळते. त्यामुळे आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहावे, अशी अपेक्षा असल्याचे दरेकर म्हणाले.
अखेरीस बोलताना दरेकर म्हणाले की, आणखी काही विकासकामे राहिली असतील तर त्याची मला यादी द्या. वॉर्ड क्रमांक २५ मधील सर्व कामं आपल्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण करू. मागाठाणेसाठी आणखी काही कोटींचा निधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला उपलब्ध करून देणार आहेत. आपण लोकांच्या कामाला न्याय देऊ.’
ML/KA/PGB
5 July 2023