अमेरिकेत पन्नास प्रकारच्या कर्करोगांची एकत्रित चाचणी

 अमेरिकेत पन्नास प्रकारच्या कर्करोगांची एकत्रित चाचणी

अमेरिकेत पन्नास प्रकारच्या कर्करोगांची एकत्र चाचणी सुरू होणार आहे. या निदान चाचणीची तपासणी अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने (National Institutes of Health)घेतली असून त्याचे निकाल समाधानकारक आले आहेत. या चाचणीद्वारे एकाच वेळी ५० प्रकारच्या कर्करोगांचे निदान होणे शक्य होईल. त्यातील तीन प्रकारच्या कर्करोगांची तर आतापर्यंत कोणतीही चाचणीच उपलब्ध नव्हती

अमेरिकेतील औषध निर्मिती कंपनी ग्राईलने ही चाचणी (Galleri Test.) विकसित केली असून त्याला गालेरी टेस्ट असे नाव देण्यात आले आहे. या चाचणीच्या माध्यमातून कर्करोग निर्माण करण्याची शक्यता असलेले डीएनए शोधले जाणार आहेत. त्याचबरोबर रक्तामध्ये वाहत असलेल्या विविध प्रकारच्या कर्करोगांची निर्मिती करू शकतील अशा स्रावांची चाचणी होऊ शकेल.

या निदानतंत्राची चाचणी गेल्या वर्षापासून अमेरिका व कॅनडातील २५ हजार लोकांवर घेण्यात आली आहे. त्यातून १०० जणांमागे एका संभाव्य कॅन्सर रुग्णांचे निदान झाले होते. त्यातील ६२ टक्के रुग्णांना प्रत्यक्षात कॅन्सर झाल्याचे नंतर आढळले.

या निदान तंत्राच्या मुख्य संशोधक व ओरेगॉन आरोग्य व विज्ञान विद्यापीठातील किरणोत्सार उपचार विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. निमा नबाविझाडेह(Dr. Nima Nabavizadeh) यांनी म्हटले की, कर्करोगाचे जितके लवकर निदान होईल, तितके रुग्णावर उपचार करणे शक्य होते. तसेच या तंत्रामुळे कर्करोग निदानात आमूलाग्र बदल होईल.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *