स्वातंत्र्य दिन समारंभाची मंत्रालयात रंगीत तालीम

 स्वातंत्र्य दिन समारंभाची मंत्रालयात रंगीत तालीम

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन १५ ऑगस्ट २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालय येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येणार आहे. Color Rehearsal of Independence Day Ceremony in Ministry

सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागामार्फत भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय येथे ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अशोक गायकवाड यांच्यासह मंत्रालयीन विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

ML/KA/PGB
13 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *