आरक्षणासाठी उद्यापासून जरांगे पुन्हा उपोषणावर

 आरक्षणासाठी उद्यापासून जरांगे पुन्हा उपोषणावर

आरक्षणासाठी उद्यापासून जरांगे पुन्हा उपोषणावर

जालना, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेल्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज सरकार कडून आश्वासन पूर्ण झाले नाही,तर उद्यापासून मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसणार आहेत . यामुळे उद्यापासून सर्वपक्षीय नेते,आमदार,खासदारांना गावबंदी जाहीर करण्यात आली आहे. Collective worship of Buddha was held at Diksha Bhoomi…

मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत आज संपणार आहे.आज दिवसभरात काहीच निर्णय आला नाही तर मनोज जरांगे उद्यापासून पुन्हा कडक आमरण उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह,मराठा समाज बांधवांसह मनोज चौंडी येथे होत असलेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यासाठी अंतरवाली सराटी येथून आज रवाना झाले आहेत.

आमचा कोणाशीही वैरभाव नाही माझ्या उपोषण काळात मला भेटण्यासाठी ,पाठिंबा देण्यासाठी सगळेच येऊन गेले आहेत.राजमाता अहिल्यादेवी यांचं दर्शन घेणार,ते पण आमचेच बांधव आहेत त्यामुळे मी जात आहे अशी प्रतिक्रिया मनोज यांनी दिली आहे.
आज आरक्षण मिळेल,
मुख्यमंत्री यांनी शब्द दिला आहे आणि ते शब्द पाळतील असा विश्वासही मनोज यांनी व्यक्त केला आहे. आपली प्रतिमा टिकवण्यासाठी त्यांना आरक्षण द्यावं लागेल,नसता जन सामन्यात त्यांची प्रतिमा खराब होईल.ते जे बोलतात ते करतात हा मराठा समाजाला भरवसा आहे त्यामुळे आरक्षण मिळेल असेही मनोज म्हणाले.

ML/KA/PGB
24 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *