कुलाबा ससून डॉक येथील मच्छीमारांच्या समस्या सोडवणार

 कुलाबा ससून डॉक येथील मच्छीमारांच्या समस्या सोडवणार

मुंबई,दि. 26: कुलाबा ससून डॉकमधील मच्छिमारांच्या विस्थापनाच्या गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनी नुकतीच केंद्रीय बंदर व जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनवाल यांची भेट घेतली. बैठकीस सुशीलकुमार सिंह, अध्यक्ष एमबीपीटी हे देखील उपस्थित होते. या बैठकीत कुलाबा येथील ससून डॉकमधील गोदामांवरील अन्यायकारक कारवाई होणार आहे. तसेच इतर प्रलंबित विषयांबाबत मच्छीमार समुदायाची वस्तुस्थिती त्यांना सांगितली. त्यांना गोडाऊन क्रमांक १५८ मधून गरीब मच्छिमारांना विस्थापित करणारी कारवाई थांबवण्याची विनंती केली. त्यावर मंत्री महोदय यांनी सहमती दर्शवली. तसेच, १२ जून २०१५ रोजी तत्कालीन केंद्रीय मंत्री नितीन गडकरीनी घेतलेला निर्णय लवकरच अंमलात आणला जाईल, असे आश्वासनही माननीय मंत्री सोनवाल महोदय यांनी सावंत यांना दिले. हा निर्णय मच्छीमार समाजासाठी मोठा दिलासा आणि न्याय देणारा ठरणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *