कुलाबा कॉजवे परिसरातील ६७ अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात निष्कासन कारवाई.

 कुलाबा कॉजवे परिसरातील ६७ अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात निष्कासन कारवाई.

मुंबई, दि ५

कुलाबा कॉजवे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मंगळवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागाकडून निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ६७ अनधिकृत फेरीवाल्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले.

अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे आणि नागरी नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली जात आहे.

अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे आणि नागरी नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने उप आयुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव, ए विभागाचे सहायक आयुक्त श्री. जयदीप मोरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

या कारवाई अंतर्गत वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या कुलाबा कॉजवे येथील एकूण ६७ अनधिकृत फेरीवाल्यांवर निष्कासन कारवाई करण्यात आली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. यापुढे देखील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *