कुलाबा विभागातील नागरिकांनी नार्वेकर यांच्याकडे मांडल्या समस्या

 कुलाबा विभागातील नागरिकांनी नार्वेकर यांच्याकडे मांडल्या समस्या

मुंबई, दि १६
कुलाबा विभागातील विविध समस्या मांडण्यासाठी नागरिकांनी आमदार राहुल नार्वेकर यांची कुलाबा येथे भेट घेतली. या भेटीत नागरिकांनी आपल्या समस्या नार्वेकर यांच्याकडे लेखी स्वरूपात दिल्या. या सर्व समस्यांबाबत दक्षिण मुंबईतील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
या बैठकीत जी व एफ रोड येथील बंद आरे स्टॉल काढणे, वाढीव मालमत्ता कर संदर्भातील अडचणी, चंदनवाडी स्मशानभूमीतील विद्युत दहन यंत्रणा दुरुस्ती, ए आणि सी वॉर्डमधील पदपथांची दुरुस्ती, मरीन ड्राईव्ह बस स्टॉप व विद्युत पुरवठा सुधारणा, रस्ते व पायाभूत सोयी-सुविधा, मरीन ड्राइव सिग्नलवरील वाहतूक कोंडी अशा विविध विषयांवर चर्चा झाली.
सदर बैठकीस संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नागरिकांच्या दैनंदिन सोयीसाठी ठोस निर्णय घेऊन तातडीने अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला असल्याची माहिती आमदार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *