कुलाबा येथील कोळी समाजाने मानले उद्धव ठाकरे यांचे आभार.

मुंबई, दि ३
कुलाबा येथील कोळी समाजाची ससून डॉक येथील गोडाऊन केंद्र सरकारद्वारे खाली करण्यात येणार होते याबाबत शिवसेना कोळी समाजाच्या मागे खंबीरपणे उभी राहून त्यांचे गोडाऊन खाली करू नये यासाठी लढली त्याबाबत कुलाबा येथील कोळी समाजाने उद्धव ठाकरे यांची नरिमन पॉईंट येथील शिवालय येथे भेट घेऊन समाजासाठी केलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल आभार मानून सत्कार केला. कोळी समाजाचा प्रश्न आमदार आदित्य ठाकरे आणि सचिनभाऊ आहिर यांनी हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात औचित्याने मांडला. ज्यामुळे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी खात्री दिली की केंद्र-राज्य सरकारच्या वादामुळे कोळी समाजावर कोणताही प्रकारचा अन्याय होणार नाही.तसेच त्यांचे असलेले गोडाऊन खाली करण्यात येणार नाही.
तसेच खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय जहाजबांधणी मंत्री सर्वानंद सोनवळ यांची भेट घेऊन ससून डॉक्स येथील ही गोडाऊन खाली होणार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१५ मध्ये घेतलेला निर्णय लवकर घेतला जाईल, अशी ग्वाही खासदार अरविंद सावंत यांना दिली होती. या साऱ्या घटनामुळे कोळी समाजाला फार मोठा दिलासा मिळाला.
आपला संघर्ष कायम ठेवून एकजूट मजबूत ठेवण्याचे आवाहन ह्यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोळी समाजाला केले.
ह्यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर, शिवसेना उपनेते अशोक धात्रक, विभागप्रमुख संतोष शिंदे, उपविभागप्रमुख कृष्णा पवळे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS