नारळाची डबलडेकर वडी

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
नारळाची डबलडेकर वडी
( कृत्रिम रंग, वास नसलेला पदार्थ. )
साहित्य
खोवलेला ओला नारळ एक, अर्धा किलो जांभळांचा गर आटवून,थोडा खवा आणि साखर चार मोठे चमचे.
क्रमवार पाककृती:
जांभळाचा हंगाम जवळपास संपलाच आहे. बाजारात थोडीच शिल्लक होती ती आणली. नारळाच्या ओल्या खोबऱ्याच्या वड्या आपण करतोच. त्यात थोडा बदल करून. जांभळांचा गर/ रस आटवणे. घट्ट होत आल्यावर त्याप्रमाणात थोडी साखर घातली. शिजवलेल्या अर्ध्या खोबऱ्याच्या भागात आटवलेला जांभूळ गर मिळवून किंचित शिजवले. शिजवलेले खोबऱ्याचे पांढरे /जांभळे थर एकावर एक थापले. वाळल्यावर कापून वर्ख लावला. खोबरे साखर शिजवताना खूप कोरडे करून नये. थोडे ओलसर असावे.
Coconut Double Decker Bread
ML/ML/PGB
21 Apr 2024