लवकरच दाखल होणार Renault कंपनीच्या CNG गाड्या

 लवकरच दाखल होणार Renault कंपनीच्या CNG गाड्या

मुंबई,दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Renault आता त्यांच्या गाड्यांमध्ये CNG पर्याय देखील देणार आहे. कंपनीने आज ही माहिती दिली. हॅचबॅक कार रेनॉल्ट क्विड, बजेट एमपीव्ही रेनॉल्ट ट्रायबर आणि रेनॉल्ट किगर ही सीएनजीसह कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून लाँच करेल. Renault आता त्यांच्या गाड्यांमध्ये CNG ऑप्शन देखील देणार आहे. परंतु त्यांना फॅक्ट-फिटेड सीएनजी दिले जाणार नाही; त्याऐवजी, रेनॉल्ट एक रेट्रोफिटमेंट किट देत आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या रेनॉल्ट कारमध्ये CNG बसवायचे असेल, तर त्याला कंपनीच्या अप्रूव्‍ड डीलरकडे जावे लागेल आणि CNG किट बसवावे लागेल.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गाड्यांमध्ये CNG बसवण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल, हॅचबॅक कार क्विडसाठी कारच्या किमती व्यतिरिक्त 75,000 रुपये देऊन CNG किट बसवावे लागेल. तर ट्रायबर आणि किगरमध्ये सीएनजी किट बसवण्यासाठी 79500 रुपये द्यावे लागतील.

Renault India चे व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम एम म्हणाले की, आम्ही नेहमीच नवीन टेक्निक आणि पर्यावरणपूरक पद्धतींवर काम करत असतो. या अनुशंगाने, आम्ही आमच्या सर्व मॉडेल्समध्ये Government अप्रूव्‍ड सीएनजी किट बसवण्याचा ऑप्शन ग्राहकांना दिला आहे. ग्राहक त्यांच्या रेनॉल्ट कारमध्ये सीएनजी किट बसवून सीएनजी तसेच पेट्रोलवर कार चालवू शकतील.

SL/ML/SL

24 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *