नौदल दिन कार्यक्रम पूर्वतयारीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

सिंधुदुर्ग, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदाचा नौदल दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, त्यानिमित्त जोरदार तयारी सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे सुरू आहे या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक व्यक्ती येत आहेत. या सर्व तयारीची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
शिंदे यांनी राजकोट किल्ला येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीची पाहणी केली. तसेच इतर व्यवस्थेचा आढावा घेतला .
हा सोहळा भव्यदिव्य होणार असून हा सोहळा महाराष्ट्रात साजरा करत असल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आहोत. असे सांगतानाच शिंदे यांनी हा सोहळा म्हणजे महाराजांना मोठं विनम्र अभिवादन असल्याचे एकनाथ शिंदे यांन माध्यमाबरोबर बोलताना सांगितले.
ML/KA/SL
30 Nov. 2023