मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात महायुती सरकार आल्यानंतर गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामकाजात सक्रीय झाले आहेत. आता सायबर गुन्ह्यासंदर्भात सरकारने काही महत्वाची पावलं उचलली आहेत. फडणवीस यांच्याविरोधात बदनामीकारक पोस्ट व व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या १२ लोकांच्या प्रोफाईलविरोधात महाराष्ट्र सायबर विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर ही बदनामी करण्यात आली होती. त्या अकाऊंटवरून पोस्ट केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या डॉक्टरेट आणि इतर संदर्भहीन व्हिडिओंच्या आधारे ही कारवाई मंगळवारी करण्यात आली आहे.

ML/ML/PGB
25 Dec 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *