एक है तो सेफ है याप्रमाणे आपल्याला वाटचाल करावी लागेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: भारताने नोव्हेंबर २००८ मध्ये
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ सारखी कारवाई केली असती, तर कोणीही पुन्हा देशाला लक्ष्य करण्याचे धाडस केले नसते.आपण एक है तो सेफ है याप्रमाणे आपल्याला वाटचाल करावीच लागेल असे जाहीर प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी २६/११ हल्ल्याच्या घटनेला १७ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
‘ग्लोबल पीस ऑनर्स २६/११ च्या नायकांचे आणि पहलगाम हल्ल्यातील बळींचे स्मरण’ हा कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील दिव्यज फाउंडेशनने आयोजित केला होता. याप्रसंगी की, फडणवीस म्हणाले ‘दहशतवादी हल्ला हा केवळ ताज आणि ट्रायडंट हॉटेल्सवरील हल्ला
नव्हता. तर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि शहरावरील हल्ला हा देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे. जर आपण हे समजून घेतले असते आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ करण्याचे धाडस दाखवले असते तर, कोणीही पुन्हा आपल्यावर हल्ला केला नसता.’
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात, ज्यामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्री मार्गाने शहरात प्रवेश केला आणि अराजकता पसरवली, त्यात
किमान १६६ जणांचा बळी गेला. १७वर्षे उलटून गेली असली तरी, आमच्या मनात अजूनही वेदना आहेत, असे फडणवीस म्हणाले. मुंबई आणि इतर शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी वापरण्यात येणारा तीन हजार किलो आरडीएक्स जप्त करण्यात यश आल्याबद्दल त्यांनी सुरक्षा यंत्रणांचे कौतुक केले. त्यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे शहीद आणि शूरवीरांना आदरांजली वाहिली.
सौ.अमृता फडणवीस यांच्या ‘दिव्यज फाउंडेशन’च्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजही ताज हॉटेलसमोर उभे राहिले की त्या दिवसाचे भयंकर आवाज, आग, धूर आणि भीतीचा थरकाप मनात जिवंत होतो असे याप्रसंगी नमूद केले. त्या दिवसाची आठवण काढली तरी अंगावर शहारे येतात.
२६/११ हल्ल्यात कसाबला सामोरे गेलेले धैर्यवान अधिकारी सदानंद दाते यांचा यावेळी विशेष उल्लेख केला. ते जखमी झाले, पण मागे हटले नाहीत असे यावेळी सांगितले. आता देशात मोदीजींचे नेतृत्व आहे आणि आपल्या सुरक्षा यंत्रणा कायम सज्ज आहेत. त्यामुळे पाकिस्तानने कितीही डाव रचले तरी ते सफल होणार नाहीत.
सौ.अमृता फडणवीस यांनी खऱ्या अर्थाने देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती म्हणजे काय आहे ते या कार्यक्रमातून दाखवून दिले.
मुकेश अंबानी यांनी रिलायन्स उद्योग समूहाच्या माध्यमातून जसे साम्राज्य उभे केले तसे त्यांच्या पत्नी सौ.नीता अंबानी यांनी सामाजिक कार्याचे साम्राज्य निर्माण केले असल्याचे मत यावेळी व्यक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी सौ.नीता अंबानी तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांचे कुटुंबीय, सिने अभिनेते शाहरुख खान, रणवीर सिंग, सुनील शेट्टी आणि पोलिस अधिकारी आवर्जून उपस्थित होते.KK/ML/MS