ढगफुटी सदृश पाऊस, पाणी साचून पिके गेली पाण्याखाली

 ढगफुटी सदृश पाऊस, पाणी साचून पिके गेली पाण्याखाली

जालना, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील अनेक गावात जोरदार पाऊस झालाय. घनसावंगी तालुक्यातील रामसगाव, शेवता, बानेगाव शिवारात ढगफुटी सदृश पाऊस पडून खरीपाच्या मूग, कापूस, सोयाबीन पिकात पाणी साचून पिके पाण्याखाली गेली आहेत. तर जोरदार पावसामुळे नदी – ओढे, नाले ओसंडून वाहून अनेक शेतऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे.

घनसावंगी तालुक्यात अनेक ठिकाणी समाधानकारक तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाउस पडला. त्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी समाधानी तर काही ठिकाणचे शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान हा झालेला पाऊस दोन वर्षातील सर्वात मोठा पाऊस आहे.

ML/ML/SL

25 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *