आज जालन्यात पुकारला बंद

 आज जालन्यात पुकारला बंद

जालना, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला यामध्ये आंदोलक महिला युवती यांच्यावर सुद्धा पोलिसांनी लाठी हल्ला केला. या लाठीचार्ज मुळे पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक महिला आणि युवक जखमी झाले आहेत या घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

या बंदला पाठिंबा देण्यासाठी आरोग्य सुविधा, शाळा – महाविद्यालय वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठान, वाहतूक, बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठऊन जालना बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. याचाच एक भाग म्हणून आणि घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज जालन्यात अंबड चौफुली येथे भव्य रस्ता रोको मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मराठा समाजाच्यावतीने आज जालना जिल्हा बंदची हाक देखील देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात रहावी म्हणून पोलीस प्रशासनाने देखील झाले असून पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. एकंदरीतच या घटनेचा निषेध सर्व स्तरातून नोंदविण्यात येत असून आज जालन्यात देखील भव्य रास्ता रोको आणि जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या दरम्यान आज विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आंदोलक कार्यकर्त्यांची आणि जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली यात छत्रपती संभाजीराजे , शरद पवार यांचा समावेश आहे. Closed today in Jalna

ML/KA/PGB
2 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *