हिंडेनबर्ग प्रकरणी अमेरिकन सरकारकडून अदानींना क्लिनचिट

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
हिडेनबर्गच्या आरोपांमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अदानी ग्रुपवरील सावट आता दूर झाले आहे.कारण या प्रकरणात आता अमेरिकन सरकारने अदानींना क्लिन चिट दिला आहे. अदानी समूहाविरुद्ध हिंडेनबर्गच्या आरोपांची अमेरिकन सरकारकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण झाली आहे. अमेरिकन सरकारने अदानी यांना क्लीन चिट दिली आहे. तपासानंतर अमेरिकन सरकारने सांगितले की, हिंडनबर्ग अहवालात गौतम अदानी यांच्यावर करण्यात आलेले फसवणुकीचे आरोप निराधार आहेत. त्याच वेळी हिंडेनबर्गच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत.
अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्गने अदानी ग्रुपवर हेराफेरीचा आरोप केला होता. हिंडेनबर्गने वर्षाच्या सुरुवातीलाच अदानी समूहावर लेखापरिक्षणात फेरफार आणि शेअर्सचे अतिमूल्यांकन केल्याचा गंभीर आरोप करून धक्कादायक खुलासा केला. हिंडेनबर्गच्या खुलाशानंतर अदानींना मोठा धक्का बसला आहे. अदानी समूहाचे सर्व शेअर्स कोसळले. हिंडेनबर्ग वादळात अदानींची निम्म्याहून अधिक संपत्ती नष्ट झाली. एजन्सींनी अदानींकडे तपास सुरू केला. अदानींचे मार्केट कॅप 100 कोटींहून अधिक घसरले. अदानी प्रकरणाबाबत रस्त्यांपासून संसदेपर्यंत गदारोळ झाला होता, मात्र आता अदानींना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकन सरकारने अदानींना क्लीन चिट दिली.
दरम्यान या निकालाचा सकारात्मक परिणाम शेअर्सवर दिसून आला. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली. शेअर बाजारातील वाढीचा फायदा अदानी समूहाच्या शेअर्सला होत आहे. आज अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांचे शेअर्स वधारले. बाजार उघडल्यानंतर एका तासाच्या आत समूहाच्या मार्केट कॅपमध्ये 82 हजार कोटी रुपयांची वाढ झाली.
SL/KA/SL
5 Dec. 2023