पोलीस – नक्षल मध्ये उडाली चकमक,नक्षली साहित्य जप्त

 पोलीस – नक्षल मध्ये उडाली चकमक,नक्षली साहित्य जप्त

गडचिरोली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्याच्या टोकावर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वांगेतुरी गावापासून ७ किमी अंतरावर पूर्व दिशेला असलेल्या हिदूर जंगल परिसरात काल पोलीस- नक्षल मध्ये चकमक उडाली, यात जवळपास तासभर चाललेल्या चकमकीत पोलीस दलाचां वाढता दबाव पाहून घनदाट जंगलाचा फायदा घेत अंधारात नक्षल पळून गेले, त्यानंतर पोलीस विभागाने चकमक घटनास्थळी नक्षलविरोधी तीव्र ऑपरेशन राबवून जंगल परिसर पिंजून काढले असता त्यात नक्षल साहित्य मिळाले आहे.

काल संध्याकाळी पोलीस दलास एक विश्वासार्ह माहिती मिळाली की सशस्त्र नक्षली कॅडर कांकेर – नारायणपूर गडचिरोली ट्रायजंक्शनवरील वांगेतुरीपासून 7 किमी पूर्वेला हिदूर विध्वंसक कारवाया करण्यासाठी नव्याने उघडलेल्या वांगेतुरी आणि गरदेवाडा चौक्यांची रेकी करण्याच्या उद्देशाने गावात तळ ठोकून आहेत. या माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चार C60 पार्टी समावेश असलेले एक पथक क्षेत्र शोध मोहिमेवर पाठवण्यात आले आणि त्यांना हिदूर गावापूर्वी 500 मीटर अंतरावर सुमारे सात वाजताच्या सुमारास जोरदार गोळीबार करण्यात आला. पोलीस दलाने प्रत्युत्तर दिल्यावर घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले.

या परिसरात झडती घेतली असता पिथस, स्फोटक साहित्य, वायरचे बंडल, आयईडी बॅटरी, डिटोनेटर्स, क्लेमोर माइन्सचे हुक, सोलर पॅनेल आणि नक्षल साहित्य इत्यादी जप्त करण्यात आले आहेत. त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवले जात आहे.

SL/KA/SL

8 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *