शहराच्या सौंदर्यकरणाला चालना देण्यासाठी डिझाईन अँड बिल्ड स्पर्धा

 शहराच्या सौंदर्यकरणाला चालना देण्यासाठी डिझाईन अँड बिल्ड स्पर्धा

नागपूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहराच्या सौंदर्यीकरणाला चालना देण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर@ 2025 या संस्थेच्या वतीने डिझाईन अँड बिल्ड ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नागपुरातील महाल येथील टॉऊन हॉल येथे पार पडला. या वेळेला स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वात्कृष्ट 15 गटांना नागपूरचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तर स्पर्धेतील प्रथम 5 विजेत्यांना प्रत्येकी 70 हजार रुपये आणि इतर 10 विजेत्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये देण्यात आले. या स्पर्धेत प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइन स्टडीज महाविद्यालयाने बाजी मारली. ‘युवकांनी शहराप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे म्हणजे त्यांनी शहराच्या विकासाकडे टाकलेले पहिले पाऊल आहे’ असे मार्गदर्शन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी युवकांना केले. यावेळी मार्गदर्शन करतांना आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. म्हणाले की, शहराचा सर्वागीण विकास हा लोकसहभागाने शक्य आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांमधून हा सर्वसामान्य नागरिक थेट विकास कार्याशी जोडले जाते. युवकांचा सहभाग असल्यास प्रशासनालाही कार्यकरण्याचे प्रोत्साहन मिळते. त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेमुळे विकासकार्यात गती मिळते. जी २० परिषदेवेळी हे आपण सर्वानी अनुभवलेलं आहे. त्यामुळे युवकांनी अधिकाधिक प्रमाणात पुढे यावे असे आवाहन देखील आयुक्तांनी केले. नागपूर@ 2025 तर्फे चांगली संकल्पना मांडण्यात आली असून यावर मनपा सुध्दा उत्तम प्रतिसाद देत आहे. विद्यार्थ्यांतर्फे मांडलेली संकल्पनेवर निश्चित स्वरूपात अमल केले जातील असेही आयुक्त म्हणाले. नागपूर शहरातील तलावांच्या काठांवर सौंदर्यीकरण करून येथे प्रेक्षणिक स्थळांची निर्मिती करणे, बाजारांची योग्य रचना करून येथेही सौंदर्यीकरण करणे, अतिव्यस्त बाजार भागात प्रसाधनगृहांची निर्मिती, बसण्याची व्यवस्था, वस्त्यांमधील मोकळ्या जागांचे सौंदर्यीकरण करून चिमुकल्या पासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी हक्काचे उद्यान निमर्ण करणे, उड्डाण पूलाखालील जागेचा योग्य उपयोग करून येथे रमणीय स्थळांची निर्मिती करणे, स्मार्ट वाहतूक सिग्नल तयार करून चौकांचा कायापालट करणे अशा एक ना अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना नागपूर शहराप्रति येथील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी मांडल्या होत्या.

ML/KA/PGB 9 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *