अभ्युदयनगर येथे रस्त्याचे कामामुळे नागरिक हैराण
अभ्युदयनगर येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याचे काम सुरू असल्यामुळे येथील पादचारी, दुकानदार, स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. अभ्युदय नगर येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडी आणि खडी टाकली आहे आहे. तसेच रस्त्यावर एका बाजूला काम सुरू असल्याने रस्ता बंद करण्यात आल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणे फार त्रासदायक झाले आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्यामुळे रात्रीच्या अंधारात दुचाकीस्वारांची दुचाकी खड्ड्यात पडून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. तरी येथील रस्ता त्वरित दुरुस्ती करण्यात यावा अशी मागणी स्थानिक रहिवासी, दुकानदार आणि पादचारी करत आहेत. या ठिकाणी रस्त्याचे मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रीट करण्याचे काम सुरू झाल्यामुळे येथील नागरिकांना थोडासा त्रास सहन करावा लागत आहे परंतु आम्ही संबंधित महापालिकेचे अधिकाऱ्यांना भेटून हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा. यासाठी निवेदन दिले आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरच सिमेंट काँक्रीटकरणाने पूर्ण होईल आणि नागरिकांचा त्रास होत असेल अशी माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक दत्ताराम पोंगडे आणि शाखाप्रमुख जयसिंग भोसले यांनी दिले