नागरिकांनी अनुभवला शून्य सावली दिवस….

चंद्रपूर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपुरकरांनी आज ‘शून्य सावली दिवस’ अर्थात Zero Shadow Day या खगोलीय घटनेचा अनुभव घेतला. विषुववृत्त आणि कर्क वृत्त यांच्या मध्ये १९ अंश आणि ५८ मिनिटांवर चंद्रपूर शहराची भौगोलिक स्थिती आहे आणि त्यामुळे 20 मे ला सूर्य अगदी चंद्रपूर शहराच्या डोक्यावर असतो. त्यामुळे या दिवशी कुठल्याही गोष्टीची सावली ही अगदी सरळ पायात पडते आणि त्यामुळे सावली नसल्याचा आभास होतो. या खगोलीय घटनेचा अनुभव घेण्यासाठी भूगोल अभ्यासक, नागरिक, विद्यार्थी एकत्र आले. या खगोलीय घटनेचा नागरिकांनी उत्साही अनुभव घेतला.
ML/ML/SL
20 May 2024