CIDCOकडून मुख्यमंत्री कार्यालयाची दिशाभूल

मुंबई, दि. १८ :
CIDCO अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाला दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे. एका घरामागे 8 अर्ज दाखल झाल्याचा दावा CIDCO ने केला आहे. लॉटरीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याची चुकीची माहिती CIDCOकडून उघड करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये सिडकोने घरांच्या किमती जाहीर न करता लॉटरी घोषित केली होती. त्यावेळी 1.5 लाख लोकांनी पूर्वनोंदणी केली. पण किमती जाहीर झाल्यानंतर फक्त 8000 लोकांनी कन्फर्मेशन रक्कम भरली. यावरुन ही किंमत लोकांना परवडत नसल्याचे दिसत आहे. सिडकोच्या या धोरणामुळे सामान्य नागरिकांची फसवणूक झाली असून परवडणाऱ्या घराचे स्वप्न अजूनही दूरच आहे.सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणी आता नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून होत आहे.
PMAY चे उल्लंघन
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत काही स्पष्ट अटी नमूद करण्यात आल्या आहे. EWS (अतिनिकृष्ट गट) साठी किमान 30 चौ.मी.घर असावे, तर LIG (निकृष्ट गट)साठी 60 चौ.मी.पर्यंत घर असावे.परंतु,सिडकोने सर्व घरांचे क्षेत्रफळ फक्त 27.12 चौ.मी.ठेवलं आहे. म्हणजेच EWS ला सुद्धा पात्र नसलेली घरे विकली जात आहेत.याशिवाय,PMAY अंतर्गत EWS ची उत्पन्न मर्यादा 6 लाख रुपये आहे.पण सिडकोची EWS साठी असणारी घरे 38 लाखांपासून 48 लाखांपर्यंत असल्याने, अनेक अर्जदारांना गृहकर्ज सुद्धा मंजूर होत नाही. पण या उत्पन्न गटातील व्यक्तींना इतकी महागडी घरे परवडण्याच्या पलीकडे आहेत.
SL/ML/SL
18 Oct. 2025