जखमी छोटा मटका झाला जेरबंद, उपचार सुरू

चंद्रपूर दि २८:– चंद्रपूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध असणाऱ्या जखमी छोटा मटका म्हणजेच सीएम वाघालाअखेर जेरबंद करण्यात आले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खडसंगी भागातून छोटा मटकाला जेरबंद करण्यात आले, ब्रम्हा या वाघासोबत झालेल्या झुंजीत मे महिन्यात छोटा मटका गंभीर जखमी झाला होता तर ब्रम्हा वाघाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अलीकडेच गाईंच्या एका कळपावर हल्ला करताना छोटा मटका पुन्हा जखमी झाला होता, त्यामुळे या वाघाला जेरबंद करून उपचार करावे अशी अनेक स्वयंसेवी संस्था आणि वन्यजीव प्रेमींनी मागणी केली होती. जखमी असलेल्या छोटा मटका मुळे मानव-वन्यजीव संघर्ष होऊ नये म्हणून त्याला जेरबंद करण्यात आल्याचा ताडोबा प्रशासनाकडून प्रेस नोट द्वारे खुलासा करण्यात आला आहे. चंद्रपूर येथील ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर येथे त्यावर उपचार करण्यात येत आहेत.ML/ML/MS