सीएचएम कॉलेजच्या आजी- माजी विद्यार्थ्यांची सलग २५ वर्षे कुष्ठरोगी, वृद्धांसोबत दिवाळी

 सीएचएम कॉलेजच्या आजी- माजी विद्यार्थ्यांची सलग २५ वर्षे कुष्ठरोगी, वृद्धांसोबत दिवाळी

ठाणे दि ९ : चांदीबाई महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी हे पनवेलच्या नेरे येथील कृष्ठरोगी, वृद्धाश्रम असलेल्या शांतीवनात गेली २४ वर्षे दिवाळी साजरा करतात. यंदाचे २५ वर्ष असून १२ ऑक्टोबरला समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोगी आणि वृद्धासोबत दिवाळी साजरी केली जाणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी, तबलावादक विवेक भागवत यांच्यासह अनेक मान्यवर माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

नवे सहस्रक सुरू होताना उल्हासनगरच्या श्रीमती चांदीबाई हिमथमल मनसुखनी महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश पंजवानी यांनी विद्यार्थ्यांना समाजसेवेची दिशा देण्यासाठी, सकारात्मक ऊर्जेने जगण्यासाठी एक उपक्रम सुरू केला तो नेरे, पनवेल येथे असलेल्या शांतिवन या कुष्ठरुग्णांच्या, वृद्धांच्या व जे संपूर्णपणे परावलंबी आहेत अशा नागरिकांच्या वसाहतीत जाऊन त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी करण्याचा. २००० सालाच्या दिवाळीपासून सुरू झालेला हा उपक्रम आजही तितक्याच उत्साहाने सुरू आहे.

प्राचार्य पंजवानी यांच्या प्रयत्नांना साथ लाभली होती तो तत्कालीन उपप्राचार्य डॉ ज्योतिका ओझरकर, डॉ मिलिंद वैद्य, प्रा नीतिन आरेकर, प्रा सुभाष आठवले, प्रा रवि पाटील व अन्य सहकाऱ्यांची. गेली चोवीस वर्षे सातत्याने सीएचएम महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी हा उपक्रम यशस्वी रित्या आयोजित करत आहेत. प्राध्यापिका डॉ ज्योतिका ओझरकर यांच्या निधनानंतर हा उत्सव त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केला जातो.

दिव्यांची आरास, रांगोळ्या, नृत्य-गायनाने सजलेले सांस्कृतिक कार्यक्रम, याला मिळणारी शांतिवनवासियांची साथ ही या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये आहेत. शांतीवनाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड, प्रभुदेसाई यांच्या सहकार्याने हा उपक्रम आजवर यशस्वी होत आला आहे.

प्राध्यापक डॉ नीतिन आरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी, तबलावादक व कार्यक्रम संयोजक विवेक भागवत, निवेदिका प्रा अनुया गरवारे-धारप, नृत्यालंकार आदिती भडसावळे-मुळ्ये, गायक सचिन मुळ्ये, संगीत शिक्षक व गायक निषाद जोशी असे महाविद्यालयाचे अनेक आजी-माजी विद्यार्थी शांतीवनातील हा दिवाळी उत्सव आनंदाने साजरा करतात. प्रत्येक वर्षी हे सर्वजण मिळून लोकसहभागाच्या सहाय्याने एक लाखांहून अधिक रकमेचे अर्थ साहाय्य शांतिवनाला करतात. यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षी हा दिवाळी उत्सव रविवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *