चिपळूणमध्ये वाळू माफियांकडून सक्शन पंपाने वाळू चोरी सुरूच…

रत्नागिरी दि ८:– महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सक्शन पंपाने होत असलेल्या बेकायदा वाळू उत्खननावर विधानसभेत माहिती देताना वाळू माफियांविरोधत कडक कारवाईचे धोरण अवलंबले जाईल अशी सक्त ताकीद दिली होती. मात्र तरी देखील दाभोळ खाडीत सक्शन पंपाने दिवसाढवळ्या बिनदिक्कतपणे वाळू उपसा सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील वाळू माफियांकडून दिवसाला शेकडो ब्रास वाळूची चोरी होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वाळू माफियांविरुद्ध कडक कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे.