बेपत्ता श्रीनिवास वनगा यांचा ३६ तासांनी कुटुंबाशी संपर्क, पुन्हा अज्ञातस्थळी रवाना

पालघर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीनिवास वनगा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज होते. यानंतर ते बेपत्ता झाले होते. अखेर 36 तासांनंतर ते कुटुंबाशी संपर्कात आले आहेत. वनगा सोमवारी अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले होते, त्यामुळे त्यांची गायब होण्याची बातमीने पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.व्यथित होऊन अज्ञात स्थळी निघून गेलेले आमदार श्रीनिवास वनगा बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास तब्बल ३२ तासानंतर आपल्या घरी परतले. मात्र कुटुंबीयांना भेटून ते पुन्हा अज्ञात स्थळी पुन्हा निघून गेले असून आपण सुखरूप असून विश्रांतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या घटनेला दुजोरा दिला असून वनगा यांच्या घराबाहेर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना कळवून त्यांनी पुन्हा आपले घर सोडले. पालघर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न देता माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली आहे.