चायनीज मांजामुळे मृत्यू झाल्यास दाखल होणार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
नवी दिल्ली, दि. 13 : संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने देशाच्या विविध भागात पतंग उडवण्याचा खेळ खेळला जातो. मत्र पतंगाला असलेल्या चायनीज मांजामुळे दरवर्षी अनेक जण प्राण गमावतात. चायनीज मांजामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले की, बंदी असूनही जीवघेण्या घटना सातत्याने घडणे दुर्दैवी आहे आणि हे थांबवण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक आहे. न्यायालयाने निर्देश दिले की, चायनीज मांजामुळे कोणाचा मृत्यू झाल्यास, संबंधित व्यक्तीविरुद्ध बीएनएसच्या कलम 106(1) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल.
उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, जर एखादी व्यक्ती चायनीज मांजा विकताना किंवा वापरताना आढळल्यास, त्याच्याविरुद्ध थेट फौजदारी कारवाई केली जाईल. तसेच, जर अल्पवयीन मुले चायनीज मांजा वापरताना पकडली गेल्यास, त्यांच्या पालकांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला जाईल.
SL/ML/SL