न्हावा शेवा बंदरातून ४.८२ कोटींचे चीनी फटाके जप्त
मुंबई, दि. २० : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सोमवारी नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरात कपड्यांच्या एका खेपेस तस्करी करून आणले जाणारे ४.८२ कोटी रुपयांचे चिनी फटाके जप्त केले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
फटाक्यांच्या तस्करीमागील एका प्रमुख व्यक्तीला गुजरातच्या वलसाडमध्ये अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. डीआरआयने त्यांच्या सुरू असलेल्या “ऑपरेशन फायर ट्रेल” अंतर्गत न्हावा शेवा बंदरात ४० फूट लांबीचा कंटेनर पकडला. चीनमधून येणारा हा खेप “लेगिंग्ज” म्हणून घोषित करण्यात आला होता आणि तो आयसीडी अंकलेश्वरला जाणार होता, असे त्यांनी सांगितले.