चीनने केली भारताची अडवणूक, हा देश आला मदतीला

नवी दिल्ली, दि. १४ : देशभर खरीपाचा हंगाम जोरात सुरु असताता युरीआ आणि डिएपी या महत्त्वाच्या खतांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. याला चीनने केलेली अडवणूक कारणीभूत ठरत आहे. भारतात डीएपी खताचा तुटवडा आहे. युरिया नंतर डीएपी हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वापरले जाणारे खत आहे. चीनने फॉस्फेटच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. डीएपी खत बनवण्यासाठी फॉस्फेट खूप महत्वाचे आहे. यामुळे भारतात डीएपीचे उत्पादन कमी झाले आहे. चीनने २६ जूनपासून विशेष खतांची निर्यात थांबवली आहे. त्यानंतर आता इंडियन फर्टिलायझर कंपनी कृभको (KRIBHCO) आणि सीआयएल (CIL) ने सौदी अरेबियाच्या मादेन कंपनीसोबत करार केला आहे. हा करार डीएपी खताच्या पुरवठ्याबाबत आहे.
करारानुसार, मादेन कंपनी पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी भारताला ३.१ दशलक्ष टन डीएपी खत पुरवेल. या आर्थिक वर्षापासून हा करार सुरू झाला आहे. दोन्ही कंपन्या परस्पर संमतीने हा करार आणखी पाच वर्षांसाठी वाढवू शकतात. रसायने आणि खते मंत्री जेपी नड्डा सौदी अरेबियाच्या अधिकृत दौऱ्यावर असताना हा करार झाला आहे. त्यांच्या उपस्थितीत हा करार झाला.
जेपी नड्डा म्हणाले की, हा करार भारतातील शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल. यामुळे त्यांना वेळेवर खते मिळतील आणि पीक उत्पादनही चांगले होईल. आर्थिक वर्ष २५ मध्ये भारताने सौदी अरेबियातून १.९०५ दशलक्ष टन डीएपी आयात केले. हे मागील आर्थिक वर्ष २०२४ मध्ये आयात केलेल्या १.६२९ दशलक्ष टनांपेक्षा सुमारे १७% जास्त आहे.
SL/ML/SL