चीन करत आहे कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची पावडर

 चीन करत आहे कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची पावडर

बिजिंग, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  कोरोनामुळे चीनमध्ये निर्माण झालेल्या भीषण स्थितीचे चित्र आता माध्यमांसमोर येत आहे. झिरो कोविड धोरणात सवलत दिल्यानंतर मृतांचा आकडा हजारोंवर पोहोचला आहे. यामुळे अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला होता. ही समस्या सोडवण्यासाठी म्हणजे स्मशानभूमीवरील ताण कमी करण्यासाठी चीन सरकार आइसब्यूरियल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्यात मृतदेह उणे 196 अंशांवर द्रवरूप नायट्रोजनमध्ये गोठवले जातात. त्यानंतर त्याचे पावडरमध्ये रुपांतर केले जाते. या तंत्राची चाचणी चीनच्या वुहान शहरात केली जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, चीनमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा गत आठवड्याच्या तुलनेत 70 टक्क्यांनी वाढून 63,307 वर पोहोचली आहे. डब्ल्यूएचओने गुरुवारी प्रकाशित केलेल्या साप्ताहिक अहवालानुसार, 15 जानेवारी रोजी चीनमधील रूग्णालयांमध्ये अधिक मृत्यूची नोंद झाली. यासंबंधीचा आकडा आतापर्यंतचा सर्वात जास्त असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या प्रारंभीत चीनने व्यापक विरोधानंतर कोरोना चाचणी, प्रवासावरील निर्बंध व लॉकडाऊन अचानक रद्द करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून चीनमधील कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे.

मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आइसब्यूरियल तंत्रज्ञानाचा वापर करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2016 मध्येही एका स्वीडिश व आयरिश कंपनीने दफनविधीसाठी असे नवीन तंत्रज्ञान विकसित केले होते. मृत शरीराचा नायनाट करण्यासाठी या प्रक्रियेत द्रवरुप नायट्रोजनचा चपखल वापर केला जातो.

SL/KA/SL

21 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *