चीन बांधतोय जगातले सर्वात मोठे धरण, भारतावर होणारा परिणाम वाचा
चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याच्या तयारीत आहे. या सर्वात मोठ्या जलविद्युत धरणाच्या उभारणीसाठी जिनपिंग सरकारने मान्यता दिली आहे. हे धरण तिबेट पठाराच्या पूर्व भागात बांधणार आहे. चीनचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून लवकरच काम सुरू होणार आहे. याचा परिणाम भारत आणि बांग्लादेशातील लाखो लोकांवर होऊ शकतो. भूकंप आणि पुराचा धोकाही निर्माण होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर, तसेच ग्रहाच्या स्थितीवर परिणाम होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला होता. काही रिपोर्ट्सनी, या धरणामुळे अनेक घातक परिणाम होऊ शकतात, असे म्हटले आहे.