चीन बांधतोय पृथ्वी आणि चंद्राला जोडणारा Super Highway

 चीन बांधतोय पृथ्वी आणि चंद्राला जोडणारा Super Highway

बिजींग, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिका, जपान आणि अन्य विकसित राष्ट्रांना आव्हान देण्यासाठी गेल्या काही दशकांपासून चीन अवकाश संशोधन क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. चीनी शास्त्रज्ञांच्या नवनवीन कल्पनांनी जगभरातील शास्रज्ञांना स्तिमित केले आहे. चीन आता पृथ्वीवरुन चंद्रावर जाण्यासाठी सुपर हायवे बांधणार आहे. सिस्लुनर स्पेस म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील प्रदेशात हा Space Superhighway तयार केला जाणार आहे. चिनी संशोधकांनी पृथ्वी आणि चंद्र दरम्यान नेटवर्क पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी एक रोडमॅप तयार केला आहे. या सुपर हायवे म्हणजे प्रत्यक्षात सॅटेलाईटचा मार्ग असणार आहे. जपान आणि अमेरिकेच्या स्पेस एजंसी देखील अशा प्रकारचा प्रोजेक्ट राबवणार होते. मात्र, त्याआधीच चीनने बाजी मारली आहे.

या प्रोजेक्ट अंतर्गत चंद्रावर 3 ग्राउंड स्टेशनवर 30 उपग्रहांचे संपूर्ण नेटवर्क उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या सुपर हायवेवर नेव्हिगेशन आणि रिअल-टाइम कम्युनिकेशन करता येणार आहे. चायना अकादमी ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी (CAST) आणि बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्पेसक्राफ्ट सिस्टम इंजिनिअरिंगच्या संशोधक या प्रोजेक्टवर काम करत आहेत.

चीनच्या Chang’e-5 मोहिमेचे मुख्य डिझायनर यांग मेंगफेई यांच्या नेतृत्वाखालील टीम या प्रोजेक्टचा एक भाग आहे.
अंतराळवीरांसाठी हा स्पेस हायवे बांधला जाणार आहे. या स्पेस हायवेमुळे 20 किंवा त्याहून अधिक अंतराळवीरांना एकाच वेळी ऑडिओ तसेच व्हिडिओद्वारे पृथ्वीशी संवाद साधता येणार आहे.

SL/ML/SL

19 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *