चीनने तयार केली ५० वर्षे चालणारी बॅटरी

 चीनने तयार केली ५० वर्षे चालणारी बॅटरी

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोबाईलची बॅटरी अधिक वेळ चार्ज रहावी यासाठी विविध मोबाईल कंपन्या प्रयत्न करत आहेत. मोबाईलचे विविध पार्ट्स बनवण्यामध्ये आघाडीवर असलेल्या चीनमधील एका कंपनीने तर आता चक्क ५० वर्षे चालणारी बॅटरी विकसित केल्याचा दावा केला आहे. चीनमधील Betavolt या कंपनीने तयार केलेली ही बॅटरी न थकता कार्यरत राहिल. विशेष म्हणजे ही बॅटरीचा आकारही अगदी लहान आहे.

Betavolt ने तयार केलेली ही बॅटरी एखाद्या नाण्याऐवढी आहे. या बॅटरीवर प्रयोग सुरु आहे. कंपनी लवकरच बॅटरीत मोठा बदल करण्याची शक्यता आहे. ही बॅटरी बाजारात आल्यास मोठी क्रांती होईल. त्यामुळे मोबाईलचा आकार आणि चार्जरची गरज यावर मोठा परिणाम दिसेल.

चीनच्या कंपनीने विकसीत केलेली या बॅटरीला ना तर चार्जिंगची गरज आहे ना तिला मेंटनेंस असेल. ही बॅटरी अणू ऊर्जेवर चालणार आहे. या बॅटरीचा वापर ड्रो आणि मोबाईलसह इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये करण्यात येईल.
या बॅटरीत एक नाही तर अनेक वैशिष्ट्ये आहेत. बॅटरीत नेहमी आग लागण्याच्या, स्फोटाच्या घटना घडतात. पण चीनच्या कंपनीने दावा केला आहे की, बॅटरीवर दबाव पडल्याने तिचा स्फोट होणार नाही अथवा या बॅटरीला आग लागणार नाही. ही बॅटरी बाजारात आणण्यापूर्वी तिच्यावर अनेक प्रयोग करण्यात आलेले आहेत. त्या आधारे हा दावा करण्यात येत आहे.

इंडिपेंडेंटच्या रिपोर्टनुसार, आयसोटोपमधील ऊर्जेचे विद्यूतमध्ये रुपांतर होईल. त्यासाठी एक विशिष्ट तंत्र वापरण्यात येणार आहे. पण त्यामुळे बॅटरी गरम होणार नाही अथवा इतर काही नुकसान होणार नाही. पण ही दमदार बॅटरी तयार करण्यासाठी मोठा खर्च आला आहे. त्यामुळे कदाचित ही बॅटरी महागडी असेल.

SL/KA/SL

2 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *