कुपोषित आदिवासी बालकांसाठी बालविकास प्रकल्प

 कुपोषित आदिवासी बालकांसाठी बालविकास प्रकल्प

नाशिक, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी प्रकल्प आदिवासी भागातील पुलाची वाडी येथे तीव्र कुपोषित बालकांसाठीच्या ग्राम बाल विकास केंद्र पथदर्शी पायलट प्रकल्पाचे उद्घाटन एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी अशीमा मित्तल यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले.

अंगणवाडीला देण्यात आलेल्या स्मार्ट टीव्ही चे फीत कापून , दीप प्रज्वलन सरस्वती पूजन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

आदिवासी तालुक्यांमध्ये बालकांच्या कुपोषणाची समस्या गंभीर असून त्यावरील उपाययोजनांसाठी या प्रकल्पाद्वारे तीव्र कुपोषित बालकांसाठी गावातील या केंद्रामध्ये 28 दिवस विशेष उपक्रम राबविण्यात येणार असून त्यामध्ये प्रत्येक बालकाला अंगणवाडीतून दिवसातून सहा वेळा आहार औषध देण्यात येतील बाळाला विविध प्रकारच्या पौष्टिक आहार देण्यात येईल तसेच दर आठ दिवसांनी बाळाचे वजन आणि उंची मोजली जाईल आणि बालक सुदृढ होण्यासाठी आवश्यक ते उपाययोजना करण्यात येतील.

आजच्या उद्घाटन समारंभामध्ये आयुक्त रुबल अग्रवाल यांनी या ग्राम बाल विकास केंद्राची आणि आधुनिक सुविधायुक्त अंगणवाडीची पाहणी केली यावेळी त्यांच्या हस्ते सहा महिने पूर्ण झालेल्या बालकाचा अन्नप्राशन कार्यक्रम संपन्न झाला तसेच स्वरा जाधव या बालिकेला आयुक्तांच्या हस्ते बेबी किट भेट देण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित आदिवासी स्त्री-पुरुष नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या की आदिवासी भागातील विद्यार्थी ही शिकून पुढे गेले पाहिजे त्यामुळे पालकांनी आपल्या मुला मुलींना शिकवावे सिस्टीम बरोबर लढून पुढे जाण्याची मुलींची तयारी असली पाहिजे शिकून पुढे जाण्याची तुमची अंतरीक इच्छा असली पाहिजे.

राज्य आणि केंद्रशासन ग्रामपंचायत आरोग्य आणि शिक्षण विभाग सर्वांनी एकत्र कार्य करून सुदृढ बालक बालिकेचे स्वप्न नक्की पूर्ण करूया असे अग्रवाल म्हणाल्या. अति तीव्र कुपोषित बालकांप्रमाणेच मध्यम कुपोषित बालकांसाठी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत स्तरावर विशेष प्रयत्न व्हावेत यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आवश्यक तो निधी देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल म्हणाल्या की आमच्या ग्रामस्थांनी आपल्या भागात एकही बालविवाह होऊ देणार नाही असा निश्चय करावा कारण बालविवाह बालकांच्या कुपोषणाचे मुख्य कारण आहे. आदिवासी क्षेत्रातील प्रत्येक मुली ने शिकून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पूर्ण करावे. पुलाची वाडी येथील अंगणवाडी संपूर्ण जिल्ह्यात एक मॉडेल अंगणवाडी आहे.

अंगणवाडी साठी ग्रामपंचायत यांनीही मोलाचे सहकार्य केले आहे अंगणवाडी मधून बालकांना मिळणारे पोषण आयुष्यभरासाठी त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या विभागाच्या अधिकारी श्वेता गडाख यांनी केले . यावेळी उत्तम कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पारंपारिक आदिवासी स्त्री-पुरुषांनी आदिवासी नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले . पाहुण्यांना श्रीक्षेत्र त्रंबकेश्वरची आणि रत्नजडित मुकुटाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे परिसरातील अधिकारी विविध ग्रामपंचायतींच्या सरपंच ग्रामसेवक आणि आदिवासी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ML/KA/SL

10 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *