मुख्यमंत्र्यांचे नेताजी आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

 मुख्यमंत्र्यांचे नेताजी आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महान स्वातंत्र्यसेनानी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी नेताजी बोस तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित मंत्री संजय राठोड, खासदार प्रतापराव जाधव, आमदार महेश शिंदे, आमदार संजय रायमुलकर आदी मान्यवरांनीही नेताजी बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.

ML/KA/SL

23 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *