मुख्यमंत्र्यांनी घेतली आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

अलिबाग, दि. ५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे त्यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आशिर्वाद घेतले. तसेच शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले. यावेळी डॉ. सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी तसेच धर्माधिकारी कुटूंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्र्याच्या सोबत यावेळी आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे,आमदार महेंद्र दळवी हेदेखील यावेळी उपस्थित होते.
ML/ML/SL
5 April 2024