मुख्यमंत्र्यांनी स्वतः घटनास्थळी

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री हे इर्शाळवाडीत भूस्खलन झालेल्या ठिकाणी पोहोचले आहे. ते अतिशय अवघड पायवाट चालून या ठिकाणी अडकलेल्या ग्रामस्थांना मदत पोहोचवून बचावकार्य करण्याबरोबरच जनतेला धीर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला.Chief Minister himself at the spot
घटनास्थळी जाताना भेटलेल्या इर्शाळवाडीतील ग्रामस्थांची मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आस्थेने विचारपूस केली, प्रत्यक्ष परिस्थितीदेखील जाणून घेतली. त्याना धीर देत सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
ML/KA/PGB
20 July 2023