मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलगी दिविजाला ICSE बोर्ड परिक्षेत मिळाले ९२.६० टक्के

ICSE बोर्डाने दहावीचा निकाल मंगळवारी, ३० एप्रिलला जाहीर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची मुलगी दिविजा दहावीची परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. . दिविजाने 92 टक्के गुण मिळवले आहेत. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी सर्वांसोबत शेअर केली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही बातमी शेअर करताना अमृता यांनी वर्षा बंगल्यावर राहायला जात असल्याचेही फोटो शेअर केले आहेत.