महिला टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

 महिला टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

महिला टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्य सरकार महिलांसाठी नवनवीन योजना आणत आहे. राज्यभरात लेक लाडकी, मुख्यमंत्री लाडकी बहीण, बस प्रवासात 50% सवलत, शैक्षणिक सुविधा, आर्थिक महामंडळ सखी, बचत गट, महिला सक्षमीकरण या योजना दिल्यावर आता मुंबई विमानतळावर महिला खाजगी टॅक्सी चालकांसाठी आनंदाची बातमी आहे.

महिला टॅक्सी चालकांसाना तासनतास ग्राहकांची वाट पाहत ताटकळत राहवं लागू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय घेतला आहे. विमानतळावर महिलांना मिळणार हक्काचे पार्किंग, दर चार टॅक्सी नंतर एक महिला टॅक्सी असे नियोजन असणार आहे. तर येत्या काही दिवसातच एअरपोर्ट अंतर्गत महिला टॅक्सी कर्मचाऱ्यांसाठी एक स्वतंत्र कक्ष ऊभारण्यात येणार आहे. त्यामुळे टॅक्सी चालक महिलांना यामुळे मिळणार मोठा दिलासा मिळणार आहे.

Chief Minister Eknath Shinde’s big decision for women taxi drivers

ML/ML/PGB
7 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *